Pimpri : मोबाईलच्या वादातून शेजाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज – मोबाईल देण्या घेण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका व्यक्‍तीला तीन जणांनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे मंगळवारी घडली.

रामचरण बच्चू पाल (वय 55) असे मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अरुण बिपीन चौधरी, धिरज बिपीन चौधरी, सनी धुसिया (सर्व रा. बौध्दनगर, पिंपरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 27) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगनमत करून मोबाईल देण्या- घेण्याच्या कारणावरून फिर्यादी रामचरण यांना लाकडी बांबूने डोक्‍यात मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.