Pimpri : पैशांच्या वादातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पैशांच्या वादातून चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच सिमेंटचा गट्टू डोक्यात मारला. ही घटना बुधवारी (दि. 28) सकाळी पिंपरी कॅम्प परिसरात घडली.

अमित मनोहर लालगुरू (वय 40, रा. गणेश गल्ली, पिंपरी) असे जखमी व्यक्‍तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी व्यक्‍तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी अमित हे पिंपरी कॅम्प परिसरातील आपल्या दुकानात गेले होते. त्यावेळी तिथे आलेल्या चार अनोळखी व्यक्‍तींनी दुकानात येऊन ‘अण्णा का पैसे क्‍यू नही देता’ असे म्हणत लाथा बुक्‍क्‍यांनी तसेच सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये अमित जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.