New Dehli : भारतासोबत शांतता हवी – शाहबाज शरीफ

एमपीसी न्यूज – भारत आणि पाकिस्तानने शांतता राखली पाहिजे त्यांच्या लोकांच्या सामाजिक आर्थिक विकासावर लक्ष केंद़ित केले पाहिजे, असे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदन संदेशाला उत्तर देताना सांगितले.

शरीफ यांनी निवडून आल्यावर लगेचच भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य केले. दोन्ही देशात शांततापूर्ण संबंध असावेत म्हटलं आहे. शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीर समस्येचे निराकरण झाल्यानंतर दोन्ही देशांना गरीबी आणि रोजगार यासारख्या सामायिक समस्यांवर लक्ष केंद़ित करता येईल. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या टि्वटवर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरीफ यांचे अभिनंदन केले होते.

शरीफ यांनी मोदी यांना उत्तर देताना लिहिले आहे की, पाकिस्तानला भारतासोबत शांतता आणि सहकार्याचे संबंध हवे आहेत. जम्मू आणि काश्मीरसह प्रलंबित वादावर शांततापूर्ण तोडगा आवश्यक आहे, असे शरीफ यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.