New Delhi: UP च्या मुझफ्फरनगर व MP तील गुना येथे दोन स्वतंत्र अपघातात 14 मजूर मृत्युमुखी

New Delhi: At least 14 Migrant Workers Killed On Way Home In Two Separate Accidents In UP's Muzaffarnagar & MP's Guna

एमपीसी न्यूज – औरंगाबादजवळ रेल्वे रुळांवर झोपलेले 16 मजूर रेल्वेगाडीखाली चिरडले गेल्याची घटना ताजी असतानाच आपल्या गावाकडे परतणारे 14 मजूर काल रात्री दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये 14 मजूर मृत्युमुखी पडले. मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या अपघातात आठ जण मृत्युमखी पडले तर 55 जण जखमी झाले तर उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर अपघातात 6 कामगारांचा मृत्यू झाला असून चारजण जखमी झाले आहे.

मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या भीषण अपघातात आठ मजूर ठार तर 55 जण जखमी झाले आहेत. ते सर्व जण महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशला परतत होते. मिळालेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एक बस कंटेनरला धडकल्याने हा अपघात झाला.
उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये रोडवेच्या अनियंत्रित बसखाली सापडून पायी चाललेल्या सहा मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कामगार पंजाबहून बिहारमधील गोपाळगंजकडे पायी जात होते. हा अपघात मुजफ्फरनगर देवबंद सहारनपूर हायवे टोल प्लाझाजवळ झाला.

पायी प्रवास करणाऱ्या या कामगारांना मागून वेगात आलेल्या अनियंत्रित बसने चिरडले. प्राथमिक तपासणीनुसार बसचालक मद्यधुंद होता, अशी माहिती पुढे आली आहे. सर्व जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, नंतर डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्यांना मेरठ येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देशात सुरू असलेल्या कोरोना लॉकडाऊनमुळे हैराण झालेले मजूर आपापल्या गावांना मिळेल त्या वाहनाने अथवा पायी परत चालले आहे. त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने देशभर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.