World Corona Update: कोरोना रुग्णांची संख्या 44 लाखांच्या पुढे तर मृतांचा आकडा तीन लाखांच्या उंबरठ्यावर!

World Corona Update: The number of corona patients exceeds 44 lakh and the death toll is close to three lakh!

एमपीसी न्यूज – जगातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 44 लाख 25 हजार 656 इतकी झाली असून कोरोनाच्या बळींची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. 2 लाख 98 हजार 165 (6.74 टक्के) कोरोनाबाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 16 लाख 58 हजार 995 (37.5 टक्के) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जगात आता कोरोनाचे 24 लाख 72 हजार 075 इतके सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 24 लाख 26 हजार 154  म्हणजेच तब्बल 98 टक्के रुग्णांचा आजार हा सौम्य प्रकारचा असून 45 हजार 921 म्हणजेच केवळ 2 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.

मागील सहा दिवसांतील नवीन कोरोनाबाधित रुग्णांची व नवीन मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

8 मे – नवे रुग्ण 97 हजार 128  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 550

9 मे – नवे रुग्ण 88 हजार 997  दिवसभरातील मृतांची संख्या 4 हजार 248

10 मे – नवे रुग्ण 79 हजार 825 दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 510

11 मे – नवे रुग्ण 74 हजार 228  दिवसभरातील मृतांची संख्या 3 हजार 403

12 मे – नवे रुग्ण 85 हजार 315  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 320

13 मे – नवे रुग्ण 88 हजार 220  दिवसभरातील मृतांची संख्या 5 हजार 314

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या 85 हजारांच्या पुढे

अमेरिकेत मंगळवारी 1,772 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबळींचा आकडा 85 हजार 197 पर्यंत पोहचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 14 लाख 30 हजार 348 पर्यंत पोहचली आहे.

ब्राझीलमध्ये काल (मंगळवारी) 754, इंग्लंडमध्ये 494 तर मेक्सिकोमध्ये 353 कोरोनोबाधित मृत्यू नोंदविले गेले. काल इटलीत 195, स्पेन 184, स्वीडन 147, भारत 136, कॅनडामध्ये प्रत्येकी 133, जर्मनीत 123, पेरू 112, रशियात 96 व फ्रान्समध्ये 83 बळी गेले आहेत.

जागतिक क्रमवारीत ब्राझील सहाव्या स्थानावर

कोरोनाबाधित देशांच्या जागतिक क्रमवारीत ब्राझील व सौदी अरेबिया देशांनी काल (मंगळवारी) वरचे स्थान मिळवले आहे. ब्राझीलने फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान मिळविले आहे. फ्रान्स आता सातव्.ा स्थानावर आहे. सौदी अरेबियाने नेदरलँडला मागे टाकत 16 वे स्थान मिळविले आहे. नेदरलँड आता 17 व्या क्रमांकावर आहे. भारत 12 व्या तर पाकिस्तान 19 स्थानावर कायम आहे.

कोरोनाबाधित प्रमुख देशातील कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात एक दिवसात झालेली वाढ दर्शविली आहे.

  1. अमेरिका – कोरोनाबाधित 14,30,348 (+21,712), मृत 85,197 (+1,772)
  2. स्पेन – कोरोनाबाधित 2,71,095 (+1,575), मृत 27,104 (+184)
  3. रशिया – कोरोनाबाधित 2,42,271 (+10,028), मृत 2,212 (+96)
  4. यू. के. – कोरोनाबाधित 2,29,705 (+3,242), मृत 33,186 (+494)
  5. इटली – कोरोनाबाधित 2,22,104 (+888), मृत 31,106 (+195)
  6. ब्राझील – कोरोनाबाधित 1,89,157 (11,555), मृत 13,158 (+754)
  7. फ्रान्स – कोरोनाबाधित 178,060 (NA), मृत 27,074 (+83)
  8. जर्मनी – कोरोनाबाधित 1,74,098 (+927), मृत 7,861 (+123)
  9. टर्की – कोरोनाबाधित 1,43,114 (+1,639), मृत 3,952 (+58)
  10. इराण – कोरोनाबाधित 1,12,725 (+1,958), मृत 6,783 (+50)
  11. चीन – कोरोनाबाधित 82,926 (+7), मृत 4,633 (+0)
  12. भारत – कोरोनाबाधित 78,055 (+3,763) , मृत 2,551 (+136)
  13. पेरू –  कोरोनाबाधित 76,306 (+4,247) , मृत 2,169 (+112) 
  14. कॅनडा –  कोरोनाबाधित 72,278 (++1,121), मृत 5,302 (+133)
  15. बेल्जियम – कोरोनाबाधित 53,981 (+202), मृत 8,843 (+82)
  16. सौदी अरेबिया – कोरोनाबाधित 44,830 (+1,905) मृत 273 (+9) 
  17. नेदरलँड – कोरोनाबाधित 43,211 (+227), मृत 5,562 (+52)
  18. मेक्सिको – कोरोनाबाधित 38,324 (+1,997), मृत 3,926 (+353)
  19. पाकिस्तान – कोरोनाबाधित 35,298 (+2,624), मृत 761 (+37)
  20. चिली – कोरोनाबाधित 34,381 (+2,660), मृत346 (+11)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.