New Delhi : CBSE 10 वी 12 वी बोर्डाच्या उर्वरित पेपरचे वेळापत्रक जाहीर

एमपीसी न्यूज – CBSE 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक  जाहीर करण्यात आलं आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी आज याबाबत माहिती दिली. 

10वीची संपूर्ण डेटशीट जाहीर केली असून ही परीक्षा पूर्व दिल्लीची डेटशीट आहे.

1 जुलै – सोशल सायन्स

2 जुलै – सायन्स थिअरी आणि सायन्स प्रक्टिकल शिवाय होणार आहे.

10 जुलै – हिंदी कोर्स ए आणि कोर्स बी

15 जुलै – इंग्लिश कम्युनिकेटिव्ह आणि इंग्लिश लॅग्वेज, लिट

12वीच्या परिक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

1 जुलै- होम सायन्स

2 जुलै – हिंदी

CBSE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अटी आणि नियम पाळणं गरजेचं असणार आहे. परीक्षेच्या वेळेस हँड सॅनिटायजर, ट्रान्सपरंट बॉटलमध्ये विद्यार्थ्याने बाळगायचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने नाक, तोंड मास्कने झाकणं आवश्यक आहे.

प्रत्येकाने फिजिकल डिस्टन्स बाळगणं गरजेचं आहे. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याची काळजी घेऊन त्याला खबरदारी घेण्यास सांगायची आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.