Ravet : रावेतमध्ये ‘अर्सेनिकम अल्बम 30’ गोळ्यांचे वाटप

एमपीसीन्यूज : औषध कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत रावेत (ता. हवेली ) श्री सिद्धिविनायक होमिओपॅथीक क्लिनिकच्या डाॅ.  अश्विनी प्रसाद तिकोने- भोंडवे व डाॅ. प्रसाद तिकोने यांच्यावतीने रावेत येथील नागरिकांना ‘अर्सेनिकम अल्बम 30 ‘  होमिओपॅथीक गोळ्यांचे वाटप करण्यात  आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आयुष मंत्रालयाने देखील या औषधाबाबत हिरवा कंदील दाखविल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे औषध पोहोचल्यास कोविड 19 संसर्गापासून मोठा बचाव करता येऊ शकेल, असे डाॅ. अश्विनी तिकोने- भोंडवे यांनी सांगितले.

नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी म्हणून हा उपक्रम या डाॅक्टर उभयतांच्यावतीने राबविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते रविवार (दि 17) रोजी दोन हजार नागरिकांना होमिओपॅथीक गोळया वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी सेवा निवृत नायब तहसीलदार काळूराम भोंडवे, सुनंदा भोंडवे, समाजसेवक सुरेन्द्र बहिरट, उद्योजक अजय भोंडवे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या आयुष विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथीक मेडिसिन इम्युनिटी बूस्टर म्हणून सुचविले आहे. त्या अनुषंगाने डाॅ. अश्विनी तिकोने- भोंडवे व डाॅ. प्रसाद तिकोने या उभयंतांनी ‘अर्सेनिकम अल्बम 30 ‘ या गोळया मोफत वाटल्या.

या परिवाराच्या वतीने पाच हजार व्यक्तीना होमिओपॅथीक गोळया वाटप करण्यात येणार असून काल रविवारी दोन हजार नागरिकांना वाटप करण्यात आल्या. उर्वरित तीन हजार लोकांना गोळया पुढील चार दिवस संध्याकाळी 5 ते 7 वाजे पर्यंत या वेळेत श्री सिद्धिविनायक होमिओपॅथीक क्लिनिक रावेत  येथे वाटप करण्यात येणार आहे, असे डाॅ. तिकोने यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या उपक्रमास विशाल श्रीकांत गावडे व रूपाली विशाल गावडे या उभयंतांकडून मोलाची मदत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.