New Delhi : महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

फडणवीस सरकारला 24 तासांची मुदत

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने सरकारला उद्या, बुधवारी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला. तसेच उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करून त्वरित बहुमत चाचणी घेण्यात यावी. ही चाचणी गुप्त मतदान पद्धतीने केली जाणार नाही तसेच या प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण केले जावे असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी फक्त 24 तास उरले आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.