New Delhi News : खूशखबर ! शाळा उघडण्यासाठी केंद्राची अंशतः मंजुरी

एमपीसीन्यूज : कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा उघडण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अनलॉक 4 अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अंशतः मंजुरी दिली असून, त्यासाठी स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली आहे. त्यामुळे येत्या 21 सप्टेंबरपासून शाळेची घंटा पुन्हा वाजण्याची शक्यता आहे.

कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेल्या शाळाच सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनमध्ये वास्तव करणारे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही.

इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वच्छेने व पालकांच्या स्वाक्षरी पत्राच्या आधारे शाळेत जाऊन शिक्षकांकडून सल्ला घेण्याची अनुमती देण्यात आली होती. त्यानुसार येत्या 21  सप्टेंबरपासून हे वर्ग पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जारी केली आहे. यामध्ये खबरदारीचे उपाय देण्यात आले आहेत.

शाळेत जाताना तोंडाला मास्क, सहा फुटांचे अंतर ठेवणे, ठराविक काळाने हाथ धुणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक असणार आहे. शाळेच्या आवारात थुकण्यास मनाई करण्यात आली आहे.

जेथे शक्य असेल तेथे आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था यापुढेही सुरूच राहणार आहे. शिवाय यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.