New Delhi News : ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन रुपी बँकेचे विलीनीकरण करा : गिरीश बापट

एमपीसी न्यूज – ठेवीदारांचे हित लक्षात घेऊन रुपी बँकेचे विलीनीकरण करण्याची मागणी खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.

याबाबत खासदार बापट यांनी रुपी बँकेच्या विलीनीकरनाबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी रुपी बँकेचे तत्काळ विलिनीकरणाची शिफारस रिझर्व बँकेला करण्याची विनंती केली.

रुपी बँक ही 108 वर्षाची जुनी बँक आहे. मागील चार वर्षे बँकेने समाधानकारक कामगिरी केलेली आहे. तसेच खर्चातही मोठ्या प्रमाणात काटकसर केली. बँकेच्या प्रगतीचा आलेख हा मागील चार वर्षात उंचावत आहे.

बँकेच्या विलीनीकरणाचा प्रश्न गेले सात वर्षे रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित असून बँकेचे गुंतवणूकदार आणि ठेवीदार यांचा आता सहनशक्तीचा अंत झाला आहे. त्यामुळे त्यांचे कोणतेही नुकसान न होता तत्काळ निर्णय होणे अपेक्षित असलयाचे खासदार बापट यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.