New Delhi : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे ……

एमपीसी न्यूज- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये पहिला पूर्ण अर्थसंकल्प मांडत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर असलेलेमंदीचे संकट दूर करण्याचे आव्हान अर्थमंत्री कशाप्रकारे पेलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा अर्थसंकल्प सादर करीत आहेत.

अर्थसंकल्पीय भाषणातील महत्वाचे मुद्दे

# बँकांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार

# जी 20 परिषदेचे भारतात आयोजन

# नॉन गॅझेटेड पोस्टसाठी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीची निर्मिती

# करदात्यांना कोणताही त्रास होणार नाही

# टॅक्स पेअर चार्टर बनवणार

# सांस्कृतिक खात्यासाठी 3150 कोटींची तरतूद

# स्वच्छ हवेसाठी 4400कोटींची तरतूद

# कार्बन उत्सर्जन करणारे थर्मल प्लांट बंद होणार

# झारखंडमध्ये आदिवासी म्युझियम तयार करणार

# पर्यटन विकासासाठी 2 हजार 500 कोटींची तरतूद

# देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार

# महिलांसाठी 35 हजार 600 कोटींची तरतूद

# एससी एसटी कल्याण योजनेसाठी 85 हजार कोटींची तरतूद

# ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी 9 हजार 500 कोटींची तरतूद

# पोषण आहारासाठी 35 हजार कोटींची तरतूद

# महिलांच्या पोषण आहारावर भर देणार

# खासगी क्षेत्रांना डेटा सेंटर उभारण्यासाठी प्रोत्साहन

# घरामध्ये विजेजे स्मार्ट मीटर बसवणार, तीन वर्षात जुने मीटर बदलणार

# अक्षय ऊर्जेसाठी 22 हजार कोटींची तरतूद

# नॅशनल गॅस ग्रीड 27 हजार किलोमीटरपर्यंत वाढवणार

# 550 रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधा

# देशात विमान प्रवास वाढवण्यावर भर देणार

# ‘उडान’ योजनेअंतर्गत नवीन विमानतळाची निर्मिती

# पी पी पी मॉडेलवर रेल्वे चालवणार

# रेल्वेच्या खासगीकरणाचा चाचणी घेणार

# रेल्वेच्या मोकळ्या जागेत सौरऊर्जा प्रकल्प उभारणार

# देशभरात 9 हजार किमीचा इकॉनॉमिक कॉरिडॉर

# 2000 किमी चे किनारी रस्ते पूर्ण करणार

# दिल्ली- मुंबई एक्सप्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण करणार

# गुंतवणूक सुलभ होण्यासाठी ‘इन्व्हेस्टमेंट क्लिअरन्स सेल’

# पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद

# उद्योगासाठी 27 हजार 300 कोणीही तरतूद

# प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्यात केंद्राची निर्मिती करणार

# निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘निर्वित योजना’

# टॉप 100 मधील शिक्षण संस्थांकडून डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देणार

# मोबाइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती देशात होण्यासाठी प्रयत्न

# शिक्षण क्षेत्रासाठी 99 हजार 300 कोटींची तरतूद

# पी पी पी मॉडेलद्वारे 5 नव्या शहराची निर्मिती होणार

# नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करणार

# राष्ट्रीय पोलीस विद्यापीठाचा प्रस्ताव

# रोजगार देणाऱ्या शिक्षणावर भर देणार

# सर्वांपर्यंत ऑनलाईन डिग्री प्रोग्रॅम सुरु करणार

# नवे शिक्षण धोरण लवकरच अमलात आणणार

# स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद

# इंद्रधनुष्य योजनेत नव्या 12 आजारांचा समावेश

# 2025 पर्यंत टीबी देशातून हद्दपार करण्याचे उद्दिष्ट

# आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतूद

# पी पी पी मॉडेल द्वारे नव्या रुग्णालयाची निर्मिती

# शेती, ग्रामीण विकासासाठी 3 लाख कोटींची तरतूद

# 112 जिल्ह्यामध्ये आयुष्मान भारत रुग्णालयाची निर्मिती

# मासे उत्पादन 200 लाख टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट

# गावस्तरावर गोदामांची निर्मिती

# शेतकऱ्यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद

# जिल्हा स्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन देणार

# महिला बचतगटांना प्रोत्साहन देणार

# पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्ह्यामध्ये काम करणार

# 20 लाख शेतकऱ्यांना सौरपंप दिले

# अन्नदात्याला उर्जदाता बनवण्यासाठी प्रयत्न

# सेंद्रिय खाते वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

# शेतीमध्ये गुंतवणुकीवर भर

# नापीक जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प राबवणार

# शेतीसाठी सौरऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन

# कृषी,सिंचन, ग्रामीण विकासावर भर

# निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात

# प्रत्येक घटकाला अर्थसंकल्पात सामावून घेण्याचा प्रयत्नः सीतारामन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.