Chinchwad : श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्यावतीने जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन

एमपीसी  न्यूज – देशाची एकता व अखंडतेसाठी आपले बलिदान देणारे, कोट्यावधी भारतीयांचे प्रेरणास्थान, राष्ट्रभक्त, थोर शिक्षणतज्ज्ञ व जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यांना यावेळी श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

चिंचवड येथील काळभोरनगर येथे श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी विचार मंचच्यावतीने स्वर्गीय डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना अभिवादन करण्यात आले. अशा जनसंघाचे संस्थापकांची जयंती साजरी करण्याचा शहर भाजपला विसर पडला. यावेळी स्वर्गीय डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नगरसेवक अॅड. मोरेश्वर शेडगे, राजाभाऊ दुर्गे, माऊली थोरात, भिमा बोबडे, भाजपचे शहर सरचिटणीस प्रकाश जवळकर, शहर उपाध्यक्ष नंदू भोगले, दिपक कुलकर्णी, देवदत्त लांडे, प्रकाश हगवणे आदी  कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला व भारतीय जनता पार्टीची जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करुन पक्षाला बळकट करण्याचे आवाहनही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.