Pune : शिवसेना-भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाही – डॉ. नीलम गोऱ्हे

पुण्यात जागा मिळाली नसली तरी शिवसेना संपली नाही

एमपीसी न्यूज – शिवसेना – भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मोदी यांनी बेटी बचाव, बेटी पढावसाठी पुढाकार घेतला आहे. बाळासाहेब यांचे विचार पुढे नेण्याचे काम मोदी काम करीत आहे. शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी शिवसेना संपणार नाही, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाचे नव्हे तर विदेशाचे नेते झाले – खा. गिरीश बापट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता केवळ देशाचेच नव्हे तर विदेशाचे नेते झाल्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर सभा सुरू झाली आहे. त्यामध्ये बापट बोलत होते. अडीच तास वाहतूक कोंडीत नागरिकांचे जातात. आता मेट्रोमुळे हा वेळ वाचणार आहे. पुण्याला 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले आहे. 83 टाक्यांचे काम पुर्णत्वास आहे. पुणेकरांना आता पाणी साठविण्याची वेळ येणार नाही. 24 तास पाणी मिळेल. भामा आसखेड योजनेतून साडेतीन टीएमसी पाणी मिळणार आहे. पुणे शहरातून 8, पिंपरी शहारातून 3, पुणे जिल्ह्यातून शिवसेना – भाजप महायुतीचे आमदार निवडून येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातून काँग्रेस – राष्ट्रवादी, इतर पक्ष उणे करा – खा. अमर साबळे

पुणे तिथे काय उणे म्हणतात, या उक्तीनुसार पुणे जिल्ह्यातून काँग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर पक्ष उणे करा, असे आवाहन राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांनी आज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यापासून विदेशात कामगारांचा सन्मान वाढला आहे. अमेरिकेत हाऊडी कार्यक्रमामुळे मोदी हे जागतिक नेते झाले आहेत. मोदी यांचा आदर्श घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करीत आहेत. शिवसेना – भाजप महायुतीचा प्रचंड मतांनी विजय होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.