Pimpri : तथागत भगवान गौतम बुद्ध, बुद्ध आहेतच तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाबुद्ध होते – डॉ. दि. बा. बागुल

एमपीसी न्यूज – प्रज्ञा, शिल, करुणा, ह्या वर धर्म आधारित आहे. गेली दोन-तीन महिन्या पासून दररोज संध्याकाळी बुध्द आणि त्यांचा धम्म त्या पवित्र ग्रंथाचे पठण घेत होते. त्यांची वर्षावास समाप्ती म्हणजेच सांगता झाली. प्रबोधनातून सामाजिक ऐक्य व क्रांती होते आताच्या राजकीय नेत्यांनी ह्या पवित्र ग्रंथाच्या आधारे कार्य केले तर खरोखर शीलवान होईल. भगवान गौतम बुध्द, बुध्द आहेतच डॉ. बाबासाहे आंबेडकर महाबुध्द होते असे मत डॉ. दि. बा. बागुल यांनी केले.

राहुल मित्र मंडळ व संघमित्र महिला मंडळ यांच्या विद्यामाने सारानाथ बुध्द विहार, रहाटणी या ठिकाणी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी “वर्षावास समाप्ती” चा कार्यक्रम संपन झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वंदना सुत्तपठण द्वारे कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरकर होते. तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर. डी. भालेराव व अरुण चाबुकस्वार यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. तसेच गौतम बुध्दाच्या मूर्तीला पुष्पमाला अर्पण करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष शांताराम भालेराव, संघमित्रा महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना हालू, गोरख रोकडे, अमित भालेराव, बि. एस. कांबळे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, बुध्दानी दिलेले ज्ञान स्वत: अंगी करून, बुध्द प्रत्यक्षात आमलात आणून धम्म क्रांती तर केलीच पण भारतातील कोट्यावधी उपेक्षित माणसाला अंगभर कपडा दिला, पोटभर भाकर दिली, गाव कुसाबाहेरच्या माणसाला गावात आणल, संपूर्ण फाटलेल्या आणि फेकून दिलेल्या, बहिष्कृत माणसाला माणसात आणले. आणि हि क्रांती रक्त रंजीत न करता बुध्दाच्या शीलाचे आचरण करून केली. म्हणून आमच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाबुध्दच आहे. त्यांनी वयांच्या २९ व्या वर्षी सिध्दार्थ गौतम बुद्धांनी घरदार सोडून ७ वर्ष अरण्यात तपस्या केली. त्यानंतर त्याना जे ज्ञान प्राप्त झाले. जो बोध झाला तो इतिहासातील सर्वश्रेष्ठ शोध आहे. दु:ख निवारण्याचा मार्ग म्हणजेच “अष्टागिंक मार्ग “म्हणजेच” आठ अंग असलेला मार्ग कि ज्या प्रमाणे जीवनात आचरण केले पाहिजे प्रज्ञा, शिल, करुणा, ह्या वर धर्म आधारित आहे. गेली दोन-तीन महिन्या पासून दररोज संध्याकाळी बुध्द आणि त्यांचा धम्म त्या पवित्र ग्रंथाचे पठण घेत होते. त्यांची वर्षावास समाप्ती म्हणजेच सांगता झाली. प्रबोधनातून सामाजिक ऐक्य व क्रांती होते आताच्या राजकीय नेत्यांनी ह्या पवित्र ग्रंथाच्या आधारे कार्य केले तर खरोखर शीलवान होईल असे मत डॉ. दि. बा. बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पोलिस निरीक्षण सुरेश भालेराव यांनी केले. आभार गोरख रोकडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.