Nigadi : घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षारोपण; सावरकर मंडळ महिला विभागाचा उपक्रम

एमपीसी न्यूज – निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाने वटपौर्णिमेनिमित्त देहुरोडजवळील घोरावडेश्वर डोंगरावर जाऊन स्वतःच लावलेल्या वडाच्या झाडांची पूजा केली. यानिमित्ताने आणखी वडाची व इतर झाडे लावण्यात आली.

गेली दहा वर्षे अशा पध्दतीने प्रत्यक्ष डोंगरावर जाऊन वृक्षारोपण करुन वटपौर्णिमा साजरी केली जाते. आतापर्यंत पन्नास पेक्षा जास्त वडाची लागवड झाली असून काही झाडे दहा-बारा फूट उंचीची झाली आहेत. या उपक्रमात तीस पेक्षा जास्त महिलांनी सहभाग घेतला.

  • पर्यावरण संरक्षणाची व हरित प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. निसर्ग मित्र विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते व यापुढेही नियमित देखभाल सुध्दा निसर्ग मित्र विभाग करणार असल्याचे विजय सातपुते यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.