Pune News : कौतुकास्पद ! अंध दाम्पत्यांनी केले वृक्षारोपण 

एमपीसी न्यूज – अंध दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण करत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. सुयोग कुलकर्णी व त्यांच्या पत्नीने हे वृक्षारोपण केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ हडपसर शाखेच्या वतीने जागतिक मैत्री दिनानिमित्त हा उपक्रम राबविला होता. 

शाखेच्या वतीने दिवेघाट येथील ऐतिहासिक मस्तानी तलाव येथील टेकडीवर वृक्षारोपण केले. याठिकाणी वड, पिंपळ, नीम अशा फक्त देशी झाडांचे रोपण करण्यात आले.

उपक्रमाचे आयोजन शाखा सरचिटणीस आकांक्षा देशपांडे, कार्यकारी सदस्य विवेक कानडे यांनी केले. यावेळी अतुल कुलकर्णी, अभिजित देशपांडे, संतोष वैद्य, राजेंद्र कुलकर्णी, जयश्री घाटे, प्रकाश गोखले, पंकज पतके, सुयोग कुलकर्णी आदी उपस्थित होते. तसेच, जिल्हा कार्याध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा केतकी कुलकर्णी या देखील सहभागी झाल्या होत्या.

वृक्षमित्र संस्थेचे विनायक पाटील व त्यांच्या टीमने नियोजनात विशेष सहकार्य केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.