Nigdi : ऑनलाईन मका विक्रीत व्यापाऱ्याची 14 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ऑनलाईन पद्धतीने मका विक्री करणे व्यावसायीकाला चांगलेच महागात पडले असून विक्री केलेल्या मक्याचे 14 लाख 57 हजार रुपये न देता व्यावसायीकाची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार 9 नोव्हेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 या कालावधीत छिंदवाडा मध्य प्रदेश आणि घोजादंगा पश्चिम बंगाल येथे घडला.

दिलीप दशरथ राजीवडे (वय 49, रा. यमुनानगर निगडी) यांनी या प्रकरणी मंगळवारी (दि. 30) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक घोष (रा. बांगलादेश), रणजीत सिंग उर्फ अखिलेश मौर्य (रा. पश्चिम बंगाल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loni Kalbhor : दोन हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार व निलंबीत होमगार्ड अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शेती उत्पादनांचे आयात निर्यात करतात. आरोपींनी ऑनलाइन माध्यमातून फिर्यादी यांच्याकडून 14 लाख 57 हजार रुपये किंमतीचा मका घेतली. घेतलेल्या मक्याचे आरोपींनी पैसे न देता फिर्यादींची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.