Nigdi : अल्पवयीन मुलीवर मित्राकडून लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला फ्लॅटवर बोलावून घेऊन तिच्यावर मित्राने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार सोमवारी (दि. 27) दुपारी पावणेचारच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 38 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हे एकमेकांचे मित्र आहेत. आरोपीने पीडित मुलीच्या मैत्रिणीच्या माध्यमातून फोन करून पीडित मुलीला सोमवारी दुपारी आकुर्डी येथील फ्लॅटवर बोलावून घेतले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

याबाबत पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.