Nigdi : शिवीगाळ करू नका म्हटल्याने बाप-लेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – शिवीगाळ करण्यास रोखल्याने पिता पुत्राला दोघांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना 25 एप्रिल रोजी रात्री साडेसात वाजता यमुनानगर निगडी येथे घडली. याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवेक त्रिंबक शिंदे (वय 32), त्रिंबक तुकाराम शिंदे (वय 55, रा. यमुनानगर, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भिमाजी नाना गायकवाड (वय 54) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मुलगा त्यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपींनी जुन्या भांडणाचा कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी यांचा मुलगा पंकज याने आरोपींना शिवीगाळ करु नका असे म्हटले. यावरून आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारले. तर मुलगा पंकज याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.