Nigdi crime News : महिलेच्या विनयभंग प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच गैरवर्तन करणा-या व्यक्तीच्या आई आणि पत्नीने महिलेला अश्लील शिवीगाळ केली. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल खरे (वय 40, रा. दत्तवाडी, आकुर्डी), मंगल याची आई, पत्नी आणि लहान भाऊ करण (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांचे मागील अडीच वर्षांपूर्वी घरगुती कारणांवरून भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी मंगल याने फिर्यादी महिलेशी गैरवर्तन केले.

तसेच 13 सप्टेंबर रोजी आरोपी मंगल याने फिर्यादी महिलेला मोबईल फोनवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीच्या आई, पत्नीने देखील फिर्यादी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली.

याबाबत 23 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.