Nigdi crime News : ‘नशा करु नको’ असे सांगणाऱ्या जन्मदात्या माता पित्यांना मुलानेच दिला चोप

एमपीसी न्यूज – नशा कारु नको, असे समजवून सांगणा-या जन्मदात्या माता पित्यांना व्यसनी मुलानेच चोप दिला आहे. निगडीतील ओट्टास्किम परिसरात गुरुवारी (दि.5) ही घटना घडली.

याप्रकरणी अनिल गफुल घोडके (वय 45, रा. ओट्टास्किम, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश अनिल घोडके (वय 19, रा. ओट्टास्किम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल व त्यांची पत्नी आपला मुलगा आकाश घोडके यास नशा करु नको, असे समजावून सांगत होते. यामुळे चिडलेल्या आकाश याने दोघांना शिवीगाळ केली तसेच, लाकडी गट्टू मारुन फिर्यादी अनिल यांना जखमी केले.

निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.