Talegaon Dabhade : इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीचा अंतिम वर्षाचा निकाल शंभर टक्के

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे  येथील इंद्रायणी विद्यामंदिर संचलित इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी फार्मसी ) महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एस.शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबईच्या वतीने डी फार्मसी अंतिमवर्षाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला असुन या निकालात दरवर्षी प्रमाणेच याही वर्षी इंद्रायणी इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी (डी फार्मसी ) च्या विध्यार्थ्यांनी भरीव यश मिळवले आहे.

यामध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेत कु आरती शिवाजी चुडेकर हिने प्रथम (९५. ३०%), कु शितल सुभाष गिरी या विद्यार्थिनीने द्वितीय(९५. २०%) तर कु रुपाली तानाजी गोमे हिने तृतीये(९५.१०%) क्रमांक मिळवला आहे. तर बावन्न (५२) विद्यार्थी विशेष प्राविण्यासह व दोन (२) विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे गमक उलगडतांना आपल्या यशात महाविद्यालयाच्या अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक, अद्यावत प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक सुविधांनी युक्त संगणक कक्ष, मनमिळाऊ प्राचार्य तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.

त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या पालकांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले कि महाविद्यालयाची सर्व सुविधांनी युक्त इमारत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरण व सर्व प्राध्यापकांचे विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, तसेच विद्यार्थी व पालकांचा वेळोवेळी पाठपुरावा यामुळेच हे शक्य होऊ शकले.

या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव भेगडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष  रामदास काकडे, उपाध्यक्ष गोरखनाथ काळोखे, उपाध्यक्ष डॉ.दिपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा , विश्वस्त निरुपा कानिटकर व सर्व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.