Talegaon Dabhade : नवीन शैक्षणिक धोरण सर्व पातळ्यांवर उपयोगी – परेश पारेख

बीबीए आणि बीसीए विभागाचा बक्षीस वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता आपल्यातील सुप्त (Talegaon Dabhade ) गुणांना ओळखून कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्याधारीत शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे ते धोरण विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अशा तिन्ही पातळीवर समजून घेणे आवश्यक आहे, असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या महाविद्यालय विकास समितीचे सदस्य परेश पारेख यांनी व्यक्त केले.
इंद्रायणी महाविद्यालयाच्या बीबीए आणि बीसीए विभागाच्या वतीने आयोजित बक्षीस वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रसंगी विभागप्रमुख प्रा. विद्या भेगडे, डाॅ मधुकर देशमुख, प्रा काशिनाथ अडसूळ, प्रा सत्यजित खांडगे, डाॅ संदीप कांबळे, प्रा प्रसन्न नेने, प्रा छाया काशीद, डाॅ अर्चना जाधव, प्रा दीप्ती पेठे, प्रसिद्धी प्रमुख प्रभाकर तुमकर, प्रा मिलिंद खांदवे, डाॅ सुरेश थरकुडे, डाॅ सत्यम सानप तसेच तळेगाव इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे, प्रा राजेंद्र आठवले,शैलजा ढोरे, अश्विनी गोखले आदी उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : जमीन विक्रीच्या व्यवहारात एजंट कडून 30 लाखांची फसवणूक

परेश पारेख म्हणाले की, विद्यार्थी आणि शिक्षकांनी Education आणि Academics यातला फरक ओळखून काम करणे गरजेचे आहे. आपल्या जीवनात शैक्षणिक क्रांतीनेच प्रगतीच्या अनेक वाटा निर्माण केल्या आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने आयुष्याला आकार देत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या आधारे चारित्र्यसंपन्न जीवन जगावे असे मत परेश पारेख यांनी व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात शताक्षी साह हिने कथ्यक नृत्य, सिद्धी धोंडे हिने फ्युजन लावणी, ऋतुजा कुसुमकर व साक्षी कुरकुटे यांनी बॉलीवूड (Talegaon Dabhade ) नॄत्य सादर केले तर ॠषी कठाडे याने हिपहाॅप डान्स केला. अनुजा यडके, ऋतुजा कुसुमकर व साक्षी कुरकुटे यांनी मराठी रीमिक्स सादर केले. रोली यादव व दिव्या यांनी गायन केले तर दिव्या घोजगे,शर्वरी तिजगे,श्रद्धा सावंत व अनुष कदम यांनी फ्युजन रीमिक्स केले. ऋतुजा कुसुमकर हिने मराठी लावणी नृत्य सादर करून कार्यक्रम मोठ्या उंचीवर नेला.विविध गाणी, डान्स, नृत्य व लावणी म्हणून कार्यक्रमात रंगत आणली.प्रा तेजस्वी श्रीनिवास, तृतीय वर्ष बीबीए बीसीए विद्यार्थी व अमोल खैरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा विद्या भेगडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा स्नेहल मसुरकर यांनी केले.आणि बक्षिस वितरण सूत्रसंचालन प्रा दीपिका मारसोने यांनी केले तर आभार प्रा सुजाता फडतरे (Talegaon Dabhade ) यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.