Pimpri News : प्रबोधन पर्वाची जय्यत तयारी

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने 11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन (Pimpri News) करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाची जय्यत तयारी सुरु असून त्या अनुषंगाने विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक तथा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी संबंधित अधिका-यांसह  तयारीच्या कामाची पाहणी केली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारील मैदानात क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन केले असून यामध्ये विविध सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांसह चर्चासत्र, कवी संमेलन मुशायरा, कव्वाली, व्याख्यान तसेच परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक, राज्यपातळीवरील  कलावंतांसह राज्य आणि देशविदेशातील वक्ते यात सहभागी होणार आहेत.

Talegaon Dabhade : नवीन शैक्षणिक धोरण सर्व पातळ्यांवर उपयोगी – परेश पारेख

प्रबोधन पर्व तसेच जयंतीच्या काळात महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या (Pimpri News) सोयीसुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे सर्व संबंधित विभाग तयारीला लागले आहेत. या सुरु असलेल्या कामांची पाहणी आणि आढावा मुख्य संयोजक डॉ. साळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतला. यावेळी प्रबोधन पर्वाचे संयोजक तथा विशेष अधिकारी किरण गायकवाड, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत मोरे, कनिष्ठ अभियंता सचिन केदार, स्थापत्य उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पवार, उपअभियंता चंद्रकांत कुंभार यांच्यासह उद्यान, आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते.

दरम्यान, प्रबोधन पर्वासाठी महापालिका यंत्रणा सज्ज झाली असून विचार प्रबोधन पर्व मोठ्या उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिकेची जय्यत तयारी केली आहे. सर्व कार्यक्रम उत्तम पद्धतीने आणि नियोजनबद्ध  पार पडावेत यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व आवश्यक व्यवस्था करण्याबाबत  सर्व सबंधित विभागास आदेश देण्यात आले आहेत. पिंपरी, एचए कॉलनी, आणि दापोडी येथील पुतळा परिसरात आवश्यक विद्युत रोषणाई तसेच पुतळा रंगरंगोटी, सजावटीचे काम, उद्यान सुशोभिकरणाचे  अंतिम टप्प्यात आले आहे.

क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेव आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाच्या  11 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान पाच दिवसीय कार्यक्रमांना तसेच  पिंपरी येथील एचए मैदानावर 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या  महानाट्य पाहण्याकरीता  नागरिकांची संभाव्य गर्दी विचारात घेता  त्या ठिकाणी महापालिकेने विशेष सुविधा पुरविण्याकडे भर दिला आहे, असे  मुख्य संयोजक डॉ. साळवे यांनी सांगितले. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने (Pimpri News) करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.