Nigdi Crime News : दुचाकीचे शोरूम फोडून दुचाकी आणि साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – आकुर्डी रेल्वे स्टेशन रोडवर असलेले ऋतुजा ऑटो केटीएम शोरूम अज्ञात चोरट्यांनी फोडले. शोरूम मधून दुचाकी आणि स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख 71 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 7) मध्यरात्री घडली.

ऋतुजा शिवराज कोरटकर (वय 29, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आकुर्डी रेल्वे स्टेशन रोडवर ऋतुजा ऑटो केटीएम नावाचे दुचाकीचे शोरूम आहे. सोमवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश केला. शोरूम मधून एक दुचाकी आणि स्पेअर पार्ट असा एकूण दोन लाख 71 हजार 225 रुपयांचा माल चोरी करून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.