Nigdi : निसर्गमित्र गोपाळराव लेले यांचे निधन

एमपीसी निवास- रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक निसर्गमित्र गोपाळराव लेले ( वय 87 ) यांचे सोमवारी (दि.19) वृद्धापकाळाने प्राधिकरण येथील निवास स्थानी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक निसर्गप्रेमी, गडकिल्ले अभ्यासक आणि यंत्र अभ्यासक हरपला अशी भावना व्यक्त होत आहे. लेले यांनी देहदानाचा संकल्प केला असल्यामुळे त्यांचे पार्थिव दान केले जाणार आहे.

गोपाळराव लेले हे मूळचे उज्जैनचे त्यांचे आजोबा उज्जैन संस्थांनमध्ये दिवाण होते. लेले यांना एकूण नऊ भावंडे त्यापैकी चार बहिणी. गोपाळराव लेले हे सर्वात धाकटे. त्यांनी मॅकेनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग विषयातील पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काहीकाळ रेल्वेमध्ये नोकरी केली. गुजरातमधील दाहोद येथे ते काम करीत होते. त्यानंतर चिंचवडच्या ओगले ग्लास वर्क्स मध्ये त्यांनी नोकरी केली. त्यांची स्वतःची फाउंड्री होती.

लेले यांनी वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत अनेक वेळा ट्रेकिंग मध्ये भाग घेतला, मोहिमा पूर्ण केल्या. गडकिल्ल्यावर जाऊन अनेक प्रकारे माहीती त्यांनी जमवली आहे. त्यांवर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हरीत घोरावडेश्वर प्रकल्पात त्यांचे योगदान आहे. आज दुपारी दीड वाजेपर्यंत त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शन घेता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.