Pune : पुणे शहरात सकाळी अवकाळी पाऊस

एमपीसी न्यूज- सांगली, सातारा कोल्हापूर, सोलापूर असा प्रवास करीत अवकाळी पावसाने आज, मंगळवारी पहाटे सहा वाजता पुण्यात हजेरी लावली. सुमारे दहा पंधरा मिनिटे पडलेल्या पावसाने रस्ते भिजून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे मोंर्निंग वॉकला निघालेल्यांची पंचाईत झाली. या पावसाने मात्र पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, तासभर विश्रांती घेतल्यानंतर आता साडेसातच्या सुमारास पुन्हा पावसाने संततधार सुरु केली आहे. 

पुणे वेधशाळेने नोंदविलेल्या हवामान अंदाजानुसार आज कोकण, गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी, दक्शीन मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे शहराचे आजचे किमान तापमान 19 तर कमाल 32 राहणार असून आकाश अंशतः ढगाळ राहून शहराच्या काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.