Pune : आयडीबीआय अधिकारी संघटनेचे पुण्यात २४ नोव्हेंबर रोजी अधिवेशन

एमपीसी न्यूज – आयडीबीआय अधिकारी संघटनेचे २२ वे द्वैवार्षिक अखिल भारतीय अधिवेशन पुण्यात २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनास तीनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. 

संघटनेचे उपाध्यक्ष भालचंद्र कुंटे, सरचिटणीस किशोर भोसले व स्वागताध्यक्ष सूर्यकांत वझे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे अधिवेशन एस.एम.जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक गोपाळकृष्ण तडस यांच्या हस्ते व रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता होणार आहे.
भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष के.लक्ष्मारेड्डी व आयडीबीआय अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप वेलणकर हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात बँकीग क्षेत्रातील सद्यास्थिती व अन्य संबंधित विषयांवर चर्चासत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनास महाराष्ट्र, राजस्तान, कर्नाटक, दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या विविध पदाधिकाºयांची निवड, संघटनेच्या आर्थिक ताळेबंदांना मंजुरी या वेळी केली जाणार आहे. आयडीबीआय अधिकारी संघटना ही भारतीय मजदूर संघ व राष्ट्रीय बँक अधिकारी संघटना (नोबो) या संघटनांशी संलग्न असलेली बँकींग क्षेत्रातील अग्रगण्य संघटना आहे. भारतीय मजदूर संघाचेही अनेक वरीष्ठ पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.