Nigdi : महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – मल्लिकार्जुन प्रतिष्ठान (Nigdi) आणि महात्मा बसवेश्वर पुतळा समितीच्या वतीने महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. निगडी येथील बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

निगडीतील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. सुमारे 400 नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. 25 किलोमीटर अंतराची ही रॅली होती. या रॅलीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सकाळी दहा वाजता बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून पूजा करण्यात आली.

Pimpri News : महापालिका शाळांना मोफत नाट्यगृह मिळणार

याप्रसंगी महात्मा बसवेश्वर पुतळा समितीचे (Nigdi) अध्यक्ष, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे,अण्णा राय बिरादार, गुरुराज चरणीमठ, शिवाजी साखरे, दत्तात्रय बहिरवाडे, एस.बी.पाटील, वाळके, दलाल,राजू गुणवंत आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.