Pimpri News : महापालिका शाळांना मोफत नाट्यगृह मिळणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri News) प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच शिक्षण विभागाच्या कार्यक्रमाकरिता महापालिकेची सर्व नाट्यगृह मोफत उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

याबाबत नाट्यगृहांच्या व्यवस्थापकांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मनपाच्या प्राथमिक 110 व माध्यमिक 18 शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.तसेच शिक्षण विभागाकडून शिक्षक दिन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांची गरज असल्याले नाट्यगृह मोफत उपलब्ध करुन देण्याच्या आदेशाला मान्यता देण्यात येत आहे.

Today’s Gold Rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात सोन्याचा भाव झाला कमी; तर चांदीची 1000 रुपयांनी घसरण

आदेशाचे पत्र प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, कै. अंकुशराव लांडगे (Pimpri News) भोसरी, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी यांच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.