Today’s Gold Rate : अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यात सोन्याचा भाव झाला कमी; तर चांदीची 1000 रुपयांनी घसरण

एमपीसी न्यूज़ : आज अक्षय्य तृतीया, सोने खरेदीसाठी (Today’s Gold Rate) अत्यंत शुभ मानला जाणारा हा दिवस. या निमित्ताने जाणून घेऊया पुण्यात असणार सोन्याचा भाव. आज पुण्यात 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 61 हजार 820 एवढा असून कालपासून 580 रुपयांनी सोने कमी झाले आहे.  काल हाच भाव 62 हजार 400 एवढा होता.

तर,  23 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 59 हजार 950 एवढा असून कालपासून 350 रुपयांची घसरण झाली आहे.  काल हाच भाव 60 हजार 300 एवढा होता.

Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या मनात अजित पवार मुख्यमंत्री; जागोजागी लागले फ्लेक्स

तसेच 22 कॅरेट सोन्याचा भाव  57 हजार 230 एवढा असून कालपेक्षा 270 ने कमी झाल्याचे (Today’s Gold Rate) दिसून येत आहे. काल 57 हजार 500 एवढा होता.

तर, चांदीमध्ये मात्र 1000 रुपयांची घसरण दिसून आली. आज 1 किलो चांदीचा भाव 77 हजार एवढा आहे. मागील काही दिवस चांदीचा भाव 1 किलोला 78 हजार एवढा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.