Ajit Pawar : भाजपच्या बालेकिल्ल्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; राष्ट्रवादीकडून लागले फ्लेक्स

एमपीसी न्यूज : शिंदे फडणवीस सरकार विरोधात (Ajit Pawar) सुप्रीम कोर्टाचा निकाल गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजप सोबत जाऊन सत्ता स्थापन करतील. सध्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याच दरम्यान काल पिंपरी चिंचवड येथील एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची देखील इच्छा बोलवून दाखवली.

त्यानंतर पुण्यातील कोथरूड भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी संतोष डोक यांनी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अजित पवार असा मजकूर असलेला फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्समुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Pimpri Chinchwad : शहरात ‘लाल बाल पाल’ यांचे समूह शिल्प उभारावे

या फ्लेक्सबाबत संतोष डोक यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मी मागील 18 वर्षापासून कोथरूड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमांतून काम करत आहे. या कालावधीत अनेक उपक्रम राबविली असून आमचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, ही राज्यातील सर्व कार्यकर्त्यांची (Ajit Pawar) भावना आहे. तसेच, दादा लवकरच मुख्यमंत्री व्हावेत हीच माझी देखील इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.