Pimple gurav : काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले शौचालय राष्ट्रवादीने केले खुले

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक महिन्यांपासून काम (Pimple gurav) पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत पिंपळे गुरव येथील काटेपूरम चौकानजिक बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप व पँथर रिपब्लिकन पार्टी (एस) चे संस्थापक अध्यक्ष गौतम डोळस यांच्या हस्ते करण्यात आले.

सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाले. मात्र, तरीही महापालिका प्रशासनाकडून या शौचालयाचे उद्घाटन रखडवलेले होते. परिणामी नागरिक या शौचालयाच्या आडोशाला लघुशंका करीत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रोगराईची शक्यता नाकारता येत नव्हती.

Nigdi : महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

शेजारीच बॅडमिंटन हॉल, जलतरण तलाव असल्याने इथे येणाऱ्या (Pimple gurav) लहान मुले, नागरिक यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तरी महापालिकेने या शौचालयाचे उद्घाटन करणे अत्यावश्यक होते. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आले. महिला व नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शौचालय परिसरातील नागरिकांनी खुले करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.