Dighi : भर दिवसा घरफोडी करून अडीच लाखांचा ऐवज पळवला

एमपीसी न्यूज – भर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी (Dighi) दोन लाख 53 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी 11 ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत चौधरी पार्क दिघी येथे घडली.

अविराज शांताराम खाडे (वय 39, रा. चौधरी पार्क, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimple gurav : काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले शौचालय राष्ट्रवादीने केले खुले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे (Dighi) घर गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून 47 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 65 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण दोन लाख 53 हजार 265 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.