Nigdi : जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली.

लक्ष्मण नागेश धोत्रे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तीस वर्षीय महिलेने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या घरासमोर कपडे धूत असताना लक्ष्मण त्यांना त्रास देत असे. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. बुधवारी सायंकाळी लक्ष्मण याने पीडित महिलेशी हुज्जत घालतात शरीरसुखाची मागणी केली. यासाठी महिलेने नकार दिला असता लक्ष्मण याने महिलेच्या घराच्या काचा फोडून महिलेला शिवीगाळ केली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.