Nigdi: ‘एमपीसी न्यूज’ इम्पॅक्ट! दुर्गानगर येथील ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात

एमपीसी न्यूज – सांडपाणी वाहिन्या केवळ नावालाच असून (Nigdi) दुर्गानगर येथील ड्रेनेजलाईनच्या पाणी रस्त्यावर साचत असल्याबाबत एमपीसी न्यूजने वृत्त प्रकाशित करताच खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाने ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली.

निगडी तळवडे रोडवरील दुर्गानगर चौकात ड्रेनेज लाईनचे काम झाल्यानंतर दुर्गंधी व डासांच्या उपद्रवातून कायमची सुटका होणार आहे. दुर्गानगर व यमुनानगरवासीयांना काम सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

निगडी तळवडे रोडवरील दुर्गानगर परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नव्याने ड्रेनेज लाईन टाकली.

परंतु, ती सदोष असल्यामुळे वारंवार चौकात रस्त्यावरून मैला पाणी (Nigdi) वाहत होते. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. एमपीसी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने नव्याने ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

BJP : राजस्थान भाजपच्या विजयात भावेन पाठक यांचा मोलाचा वाटा!
शहराच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांना सहभागी करून घेऊन आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, रस्ते, परिवहन सेवा, याबद्दल मते जाणून घ्यावे.

एखादी समस्या असेल तर त्या समस्या सोडवण्यासाठी जेष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा कौशल्य उपयोगी पडेल. त्यासाठी प्रत्येक प्रभागात ज्येष्ठ नागरिकांची सल्ला समिती गठित करावे, अशी मागणी ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघाचे शिवानंद चौगुले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.