BJP : राजस्थान भाजपच्या विजयात चिंचवडच्या भावेन पाठक यांचेही मोलाचे योगदान!

काँग्रेसचा बालेकिल्ला केला उध्वस्त

एमपीसी न्यूज – राजस्थानमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन (BJP) करत सत्ता मिळविली. या भाजपच्या यशात पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे कार्यकारिणी सदस्य भावेन पाठक यांचेही मोठे योगदान आहे. त्यांच्याकडे जबाबदारी असलेल्या सिरोही जिल्ह्यातील तीनपैकी दोन मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकला आहे. तसेच 2000 पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा झालोर लोकसभा मतदारसंघ आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. 2000 पासून या मतदारसंघात पाठक चिकाटीने पक्षाचे काम करीत आहेत.

निवडणुकीतील अनुभव पाठक यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना सांगितला. पाठक म्हणाले, राजस्थानच्या सह प्रभारी विजया रहाटकर यांनी आमच्याकडे सिरोही जिल्ह्याची जबाबदारी सोपविली होती. या जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.

सिरोही विधानसभा, पिंडवाडा आणि रेवदर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी आमच्याकडे होती. सिरोही आणि पिंडवाडातील भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. रेवदरची जागा अगदी थोड्या मतांनी गेली.

सिरोही मतदारसंघात जातीय समीकरणे मोठी आहेत. त्या समीकरणांवर तेथील निवडणूक होते. अम्ही जातीय समीकरणे मोडीत काढून त्याला सामाजिक समीकरणाचे रुप आणले. सर्व समाजाला एकत्रित केले.

राष्ट्रहितासाठी एकत्र आणले. दररोज रॅली, घरोघरी प्रचार, बूथ लेवल, बैठका, किती बूथ लागणार, बूथची संख्या, कोणत्या बूथवर कोण-कोण बसणार आहे. त्यांची सोय, कोण कोणत्यावेळी बसणार आहे, असे सूक्ष्म नियोजन केले होते. मतदार बूथपर्यंत पोहोचेपर्यंत आमचे काम सुरु होते. आमच्या आवाहनाला मतदारांनी साथ दिली.

राज्यस्थानमध्ये भाजपसाठी वातावरण चांगले होते. काँग्रेसने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, आम्ही तो मोडीत काढला. सिरोहीतील आमचे उमेदवार ओताराम देवासी हे बाजूच्या मतदारसंघातील होते.

Pune : पुणे लोकसभा निवडणूकीत कोणाचा विजय होणार???

त्यांनी पशुपालन मंत्री म्हणून चांगले काम केले. पण, काँग्रेसने बाहेरचा उमेदवार अशा प्रचारावर भर दिला होता. स्थानिक बाहेरील (BJP) उमेदवार असा प्रचाराचा मुद्दा बनविला. परंतु, आम्ही नागरिकांमध्ये जाऊन काँग्रेसकडून पसरविला जाणारा संभ्रम दूर केला. लोकांच्या मनातील अपप्रचार काढला.

त्यामुळे ओताराम देवासी हे मोठ्या मताधिक्याने आले. तर, पिंडवाडा मधून समाराम रासिया यांनीही मोठे मताधिक्य घेत विजय मिळविल्याचे पाठक यांनी सांगितले.

विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड भाजपच्या प्रभारी वर्षा डहाळे आणि मी तिघांनी डोअर टू डोअर प्रचार केला. विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रचार केला. रहाटकर या आमच्याकडून दररोज अपडेट घेत होत्या. लोकांची मते जाणून घेतली जात होती. आम्हाला प्रचारादरम्यान रहाटकर यांचे सहकार्य चांगले मिळाले.

आजीच्या कार्याचा फायदा!

भावेन पाठक यांच्या आजी सिरोही जिल्ह्यातील प्रथम शिक्षिका होत्या. जिल्ह्यात त्यांचा स्वत:चा मोठा प्रभाव आहे. त्यांच्याबाबत आदराची भावना आहे. त्यामुळे प्रचार करताना सोपे गेले. आजीचे नाव घेतले की लोक भावूक होत होते.

नातू म्हटल्यावर तुमचे ऐकलेच पाहिजे, अशी लोकांची भावना होती. आजीला लोक प्रचंड मानत होते. प्रशासकीय सेवेतील अधिकारी आजीला खूप मानतात. त्यामुळे प्रचारादरम्यान आजीच्या कार्याचाही मोठा फायदा झाल्याचे पाठक यांनी सांगितले. (BJP)

काँग्रेसचा बालेकिल्ला केला उधवस्त!

झालोर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता. केंद्रीय गृहमंत्री राहिलेले बुटा सिंग यांना हरवून मतदारसंघ ताब्यात घेतला. त्यांची ताकद संपवून झालोर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनविला आहे. झालोर लोकसभा क्षेत्रात 2000 सालापासून आम्ही काम करत आहोत.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष बंगारु लक्ष्मण यांच्यासोबत काम केले. हा मतदारसंघ पूर्णपणे काँग्रेसच्या विचारांचा होता. पण, तळागाळात काम करुन भाजपचा बालेकिल्ला बनविला. बंगारु लक्ष्मण यांच्यासोबत काम करत असताना खूप शिकण्यास मिळाले. झालोरला आता भाजपचे खासदार आहेत.

बंगारु लक्ष्मण यांच्या पत्नी विजयी झाल्या तेव्हापासून ही जागा भाजपकडे आहे. भाजपचा हक्काचा मतदारसंघ झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.