Nigdi : NDA पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी  सावरकर मंडळातर्फे 20 जूनपासून ऑनलाईन प्रशिक्षण

Online training from June 20 by Savarkar Mandal for NDA pre-exam preparation

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे NDA  च्या (राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी) या वर्षीच्या पूर्व परीक्षांच्या तयारीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. 20  जून ते 30 जुलै या कालावधीत हे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत.

NDA मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी  निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आणि निवृत्त ब्रिगेडियर बलजितसिंग गिल हे मार्गदर्शन करणार आहेत.

दरम्यान, हे प्रशिक्षण  ऑनलाईन असल्यामुळे देशातील कुठल्याही भागातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. NDA च्या नियमानुसार या प्रशिक्षण वर्गासाठी16 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यी सहभागी होऊ शकतात.

दहावीची परीक्षा दिलेले तसेच अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी या प्रशिक्षण वर्गासाठी पात्र असतील.

स्पर्धापरीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राच्या ग्रंथालयात NDA प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध आहेत.

मंडळातर्फे गेल्या तीन वर्षामध्ये 4 विद्यार्थी NDA आणि  TES (टेक्निकल एन्ट्री स्कीम) मध्ये निवडण्यात आले आहेत. 20 विद्यार्थी NDA ची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यार्थ्यांना अधिक माहितीसाठी- भास्कर रिकामे – 9028546415, नीता जाधव :- 9881466372 / 020-27659010 या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी 11 ते 1 व दुपारी 2 ते 5 या वेळेत संपर्क साधता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.