Nigdi News : ब्राह्मण महासंघाच्या वतीने प्राधिकरणातील मारुती मंदिरात दीपोत्सव

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने प्राधिकरणातील मारुती मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि.19) हा कार्यक्रम पार पडला. देशाच्या स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशाचा नकाशाचे चित्र रेखाटून त्यामध्ये दिव्यांची आरास करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष जोशी, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका शैलजा मोरे उपस्थित होत्या. तसेच, माजी नगरसेविका डॉ. गीता आफळे, अश्विनी चिंचवडे, आर एस कुमार, महेश कुलकर्णी, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप कुलकर्णी व एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमांतर्गत ब्राह्मण महासंघाच्या सभासद नोंदणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली व फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण शहरात एक लाख सभासद नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला. दीपोत्सव कार्यक्रमासाठी पदाधिकारी यांच्यासह जवळपास दोनशे नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा शर्मिला महाजन, कार्याध्यक्ष महेश बारसवडे, सरचिटणीस सचिन कुलकर्णी, उपाध्यक्ष आनंद देशमुख, संदीप बडवे, कोषाध्यक्ष विनय पारखी, उपाध्यक्ष सुषमा वैद्य यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा नातू यांनी केले. संदीप बडवे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.