Nigdi News: आयआयसीएमआरच्या टेक्नोकेस 2021 स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद

एमपीसी न्यूज – निगडीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंट अँड रिसर्च संस्थेच्या एमसीए डिपार्टमेंटतर्फे आयोजित एक दिवसीय राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन टेक्नोकेस 2021 स्पर्धेला उत्तुंग प्रतिसाद मिळाला.

एमसीएच्या डायरेक्टर डॉ. दीपाली सवाई यांनी टेक्नोकेस स्पर्धा सुरु करण्यामागील उद्देश सांगताना विद्यार्थ्यांमधील ज्ञान, कल्पकता, लॉजिकल स्किल्स यांना सादर करण्याची संधी स्पर्धेद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. हे टेक्नोकेस स्पर्धेचे दहावे वर्ष असून महाराष्ट्रातील एकूण 19 महाविद्यालयातील 1162 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेअंतर्गत प्रोग्रॅमिंग लँग्वेजेसची ‘कोड बॅटल’आणि ‘बडींग कन्सलटंट’केस स्टडी पोस्टर प्रेसेंटेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

बक्षिस वितरण समारंभासाठी कायनेटिक कम्युनिकेशन्सचे तंत्रज्ञ, उद्योजक डॉ. दीपक शिकारपूर  हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्व पटवून दिले. त्यांनी ‘एज्युकेशन अँड टेकनॉलॉजि 2025++’ याबद्दल मार्गदर्शन करताना टाइम मॅनेजमेंट, आधुनिक तंत्रज्ञानाचा कल, सॉफ्ट स्किल्स , जपानी भाषा शिक्षण तसेच इंटर्नशिपचे करिअर मधील महत्त्व याकडे प्राधान्याने लक्ष देण्याबद्दल सूचित केले.

बडींग कन्सलटंट स्पर्धेत आकाश कुंभार, पल्लवी कांबे(आयआयसीएमआर) यांना प्रथम पारितोषिक, प्रतिक्षा हजारगे (पिसीसीओइ) हिला व्दितीय पारितोषिक, निष्ठा महेश्वरी, अपर्णा खंडेलवाल (आयआयसीएमआर) यांना तृतीय पारितोषिक मिळाले. विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. राहूल सुदामे (सिनिअर इंजिनीअरिंग पार्टनर, पर्सिस्टण्ट सिस्टिम्स), श्री. मंदार कुलकर्णी (सिनिअर ट्रेनर -क्लायन्ट ट्रेनिंग, नेटक्रेकर टेकनॉलॉजि), श्री. सुमंतो दत्ता (ज्युनिअर रिसर्च फेलो , NIT रुरकेला) या आयटी क्षेत्रातील तज्ञांनी पोस्टर कॉम्पिटिशनचे परिक्षण केले.

कोड बॅटल स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. तर, वंदना पेडणेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.