Nigdi News: इंदिरा अभ्यंकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण येथील इंदिरा वामनराव अभ्यंकर (वय 77) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ज्ञान प्रबोधिनीच्या निगडी केंद्राचे दिवंगत केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर यांच्या त्या पत्नी होत.

त्यांच्यामागे विवाहित मुलगा, मुलगी सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 28 वर्षे सलग संस्कार वर्ग चालवले तसेच 50 हून अधिक जणांकडून संपूर्ण गीता पाठ करून घेतली. दिवंगत वा. ना. अभ्यंकर यांना त्यांनी जीवनात खंबीरपणे साथ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.