Nigdi News: लोकमान्य टिळक यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी मनसेचे आंदोलन

एमपीसी न्यूज – निगडी चौकात स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्याच जागी पूर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी मनसेच्या वतीने आज (मंगळवारी) आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, विद्यार्थी सेनेचे हेमंत डांगे,जगन्नाथ वैद्य, मयुर चिंचवडे, के. के. कांबळे, ओंकार पाटोळे, आशिष चव्हाण, भागवत नागपुरे, शंतनु चौधरी, प्रसाद मराठे, गणेश काळभोर, रोहित शिंदे, धनंजय देशमुख, नाना काळभोर,रोहन कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते. याबाबत अ कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले. याविषयी लवकरात-लवकर कार्यवाही करावी. अन्यथा मनसेकडून मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

निगडी मधील मुख्य चौकातील सिग्नल जवळ 1 ऑगस्ट 1988 रोजी लोकमान्य टिळक यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला. निगडी प्राधिकरणाची मुख्य ओळख या लोकमान्य टिळक यांचा पुतळ्यामुळे होत आहे. शहरात महापालिका स्थापन झाल्यानंतर हा शहरातील पहिला पुतळा आहे. अनेक प्रकारचे मोठ मोठे विकास कामे झाले. अनेक मोठे पुतळे झाले. पण या भागातील स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आहे त्याच जागी लोकमान्यांचा पृर्णाकृती पुतळा उभारावा व परिसर सुशोभित करण्याची मागणीचे पत्र सातत्याने दिले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. तातडीने लोकमान्य यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी आंदोलकांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.