Nigdi News: विरंगुळा केंद्राला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्या; भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – सद्गुरू उद्यान यमुनानगर मधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राला भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे, अशी मागणी प्रभाग क्रमांक 13 मधील भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेकडे केली आहे.

क्रीडा समिती सभापती, स्थानिक नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांची भेट घेऊन ही मागणी केली. त्याबाबतचे निवेदन देण्यात आले. मागील काही दिवसांपासून यमुनानगर येथील सदगुरू उद्यान येथे नवीन विरंगुळा केंद्राचे बांधकाम जलद गतीने सुरू आहे. ते आता पूर्णत्वाच्या दिशेने चाललेले असताना अशावेळी भारतीय जनता पक्ष यमुनानगर तर्फे त्या विरंगुळा केंद्राला माजी पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. शहरात अद्याप तरी अटलजी यांचे नाव कुठेही दिलेले नाही. आमच्या प्रभागातील या विरंगुळ केंद्र इमारतीला त्यांचे नाव द्यावे. सर्व साधारण सभेमध्ये हा नामकरणांचा ठराव मंजूर करून घ्यावा अशी मागणी केली.

नगरसेविका कमल घोलप, प्रभाग अध्यक्ष रंगनाथ पवार, युवा मोर्चा सचिव आदित्य कुलकर्णी, युवा मोर्चा प्रभाग अध्यक्ष गिरीष देशमुख, मंडल उपाध्यक्ष बाबा परब, मंडल सरचिटणीस रमाकांत पाटील, प्रभाग सरचिटणीस शेखर आसरकर, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष शिरीष जेधे, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश आंबेरकर,प्रज्ञावंत आघाडी शहर संयोजक दीपक कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष महिला सारिका चव्हाण, महिला अध्यक्ष विमल काळभोर, योगेश साळुंखे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.