Nigdi News: चालकाचे नियंत्रण सुटल्याने खासगी बसची दोन वाहनांना धडक

क्रेनच्या सहाय्याने बस पोलीस ठाण्यात नेली

एमपीसी न्यूज  – चालकाचे नियंत्रण (Nigdi News) सुटल्याने खासगी बसने दोन वाहनांना धडक दिल्याने त्यात दोघेजण जखमी झाले. ही घटना आज (शनिवारी) दुपारी टिळक चौक, निगडी येथे घडली. अपघात करणा-या बसचे इंजीन लॉक झाल्याने क्रेनच्या सहाय्याने बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली.

यामध्ये अतुल भीमराव नवघरे (वय 40, रा. चिंचवड), किशोर रामदास भांगर (वय 30, रा. काळेवाडी) हे दोघे जखमी झाले आहेत.  दुर्गा चौक ते टिळक चौक या रोडवर टिळक चौकातील सिग्नलजवळ बस (एम एच 14 / बी ए 8433) बस उभी होती. तिच्या मागे रिक्षा (एच एच 14 / जी ई 5068), त्यामागे मोपेड दुचाकी (एम एच 14 / डी क्यू 9743) आणि त्याच्या मागे खाजगी कंपनीची बस (एम एच 14 / डी डब्ल्यू 4680) उभी होती. कंपनीच्या बसवरील चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुढील दोन वाहनांवर आदळली. यात दोघेजण जखमी होऊन रिक्षा आणि दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर बसचा चालक पळून गेला. दरम्यान, काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.

Nigdi News : वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजवर छापा; पाच महिलांची सुटका

पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक (Nigdi News) सुरळीत केली. सर्व वाहने पोलीस ठाण्यात नेली आहेत. अपघात करणा-या बसचे इंजीन लॉक झाल्याने क्रेनच्या सहाय्याने बस पोलीस ठाण्यात नेण्यात आली. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत  निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.