Nigdi Vaccination News: अजंठानगरमध्ये लसीकरण केंद्र सुरु

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 11 या भागातील अजंठानगर,दुर्गानगर, आंबेडकरनगर भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी महापालिकेच्या माता रमाबाई आंबेडकर शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

‘फ’ प्रभागाचे अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेवक भीमा बोबडे, नगरसेविका योगिता नागरगोजे, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, सामाजिक कार्यकर्ते नाना वारे, राहुल चौधरी, दिपक गायकवाड उपस्थित होते.

अजंठानगर,दुर्गानगर, आंबेडकरनगर भागातील मोठ्या प्रमाणात नागरीक लसीकरणापासून वंचित राहिलेले आहेत. या भागातील नागरीक मोलमजुरी व हातावरील काम करून पोट भरणारे आहेत. परिसरातील लोकसंख्या सुमारे 20 ते 25 हजार आहे.

या भागात कोणत्याही प्रकारे लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध नव्हती. प्रभाग क्रमांक 11 मध्ये स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, जिजामाता पार्क फुलेनगर या ठिकाणी लसीकरण केंद्र चालू आहे. परंतु, या ठिकाणी जाण्यासाठी जेष्ठ नागरिकांना येण्याजाण्यासाठी व्यवस्था नसल्याने त्रास सहन करावा लागत होता.

त्यामुळे माता रमाबाई आंबेडकर शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी विजु ठोंबरे यांनी केली होती. त्यानुसार शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.