Chikhali News : मोरेवस्तीत पेव्हिंग ब्लॉकचे काम सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग एकमधील मोरेवस्ती, म्हेत्रेवस्तीमधील रस्त्यांच्या पदावरील जुने सिमेंट ब्लॉक काढून नवीन कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

महापालिकेच्या रामदासनगर, पाटीलनगर, मोरेवस्तीमधील अंगणवाडी रस्ता, म्हेत्रेवस्ती, भाजीमंडई परिसर, सह्याद्री सोसायटी तसेच इतर सोसायटीमध्ये कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम आहे. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना करावी लागणारी कसरत टळणार आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नगरसेवक कुंदन गायकवाड, नगरसेविका स्वीनल म्हेत्रे, साधना मळेकर यांच्या प्रयत्नातून कामे सुरु झाली आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.