Nigdi : पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने शहीद जवांनाना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज- जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्यावतीने निषेध करण्यात आला. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात कॅंडल मार्च काढून पाकिस्तानचा निषेध व शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवांनाना पिंपरी-चिंचवड रोटरी क्लबच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कॅंडल मार्च काढण्यात आला.

यामध्ये रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, रोटरी क्लब ऑफ आकुर्डीचे गणेश जामगावकर, रोटरी क्लब चिंचवड मोरयाचे समीर भांडारकर, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, रोटरी क्लब प्राधिकरणचे वैजयंती आचार्य, तळेगाव सीआरपीएफचे डेप्युटी कमांडन्टड सचिन गायकवा़ड, असिस्टंट कमांडन्डट रामचरण मीना आदी उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या पुढाकाराने कॅण्डल मार्च व श्रध्दांजली कार्यक्रम घेण्यात आला.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.

दरम्यान, यावेळी, सर्व भारतीयांनी सरकारच्या पाठीशी उभं राहण्याचे आवाहन करण्यात आले. भारताच्या घरभेद्यांना धडा शिकवणं, सर्वात पहिलं आव्हान भारतासमोर आहे. शहीदांच्या कुटुंबियांना भावनिक, सामाजिक, आर्थिक अशी सर्व प्रकारची मदत करणं ही भारतीयांची प्रथम जबाबदारी आहे, असेही आवाहन या सभेत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.