BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

382
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात विरुद्ध दिशेने आलेल्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 9) महाळुंगे चाकण येथे झाला. याबाबत रविवारी (दि. 17) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रथमेश संजय शिंदे (वय 22, रा. त्रिवेणीनगर, निगडी. मूळ रा. कुंभारखाणी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. पोलीस नाईक शरद कृष्णा लोखंडे यांनी याप्रकरणी पोलिसांतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रथमेश शनिवारी त्यांच्या दुचाकीवरून महाळुंगे चाकण येथून जात होते. ते इंडोरन्स कंपनीकडून एच पी चौकाकडे जाणा-या रस्त्यावरून जात असताना भरधाव वेगात विरुद्ध दिशेने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात प्रथमेश हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती न देता अज्ञात वाहनचालक निघून गेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.