Wakad : लहान मुलांच्या भाडणांतून एकमेकांवर वार; परस्पर विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रहाटणी येथे लहान मुलांच्या भांडणावरून एकमेकांवर तलवार व सत्तुर सारख्या घातक शस्त्रांनी वार केले आहेत. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास नखातेवस्ती येथे घडली.

आबा शंकर दाखले (वय 60, रा. रहाटणी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गणेश नखाते, आकाश कारमुंगे व त्यांचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्या लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गणेश व आकाश यांनी पाच जणांनी मिळून लाकडी दांडके, तलवार व सत्तुर याने मारहाण केली. यावेळी फिर्यादी यांना मारहाण करत त्यांच्यावर तलवारीने वार केले. यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला व मनगटाजवळ दुखापत झाली. तसेच आरोपींनी दाखले यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

याच्या परस्पर विरोधात सुरेंद्र सुरेश निकम यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गौरव चव्हाण, दीपक रुपनर, सचिन एकशिंगे, दीपक दाखले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व कारमुंगे हे नखाते वस्ती येथे बोलत उभे असताना आरोपी गौरव, दीपक, सचिन हे तिथे आले व त्यांनी कारमुंगे यांचा भाऊ अक्षय रुपनर याने केलेल्या भांडणाचा राग मनात धरून कारमुंगे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्यावर कोयत्याने वार करीत कारमुंगे व फिर्यादी दोघांना जखमी केले. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.