Bhosari : इंदूबन रेसिडेन्सीतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – इंदूबन रेसिडेन्सी, भोसरी-दिघी रोड तर्फे पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सचिन सूर्यवंशी, उपाध्यक्ष महेश मोरे, सचिव आशिष पदमने, खजिनदार भूषण तायडे तसेच सोसायटी मधील 200 नागरिक उपस्थित होते. पाकिस्तानसारख्या राष्ट्राला मात देण्यासाठी आम्ही सर्व नागरिक भारतीय सैनिकांसोबत आहोत, असा संदेश देऊन सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे. तब्बल 350 किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी (दि. 14) पुलवामा जिल्ह्यात भीषण आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान शहीद झाले आहेत. सुट्टी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या 2 हजार 547 जवानांना 70 वाहनांतून नेले जात होते. प्रत्येक वेळी एक हजार जवानांना नेले जाते, पण यावेळी ही संख्या दुपटीपेक्षा जास्त होती. पहाटे साडेतीन वाजता जम्मूहून हा ताफा निघाला आणि सूर्यास्ताआधी तो श्रीनगरला पोहोचणे अपेक्षित होते. श्रीनगर-जम्मू महामार्गावर अवंतीपुरा येथील लट्टूमोड येथे हा ताफा पोहोचला असताना हा हल्ला झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.